ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

संपूर्ण देशात आता पर्यंत १ कोटी ९० लाख लोकांनी घेतली कोरोनाची लस टोचून

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. पहिल्या टप्यात वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती.

त्या पाठोपाठ दुसऱ्या टप्यात वरिष्ठ नागरिक तसेच अतीगंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस टोचण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. मिळलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशातील १ कोटी ९० लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

याआधी गुरुवारी देशात सर्वात जास्त कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ४० टक्के अधिक लसी देण्यात आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. भारत आता कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत जगात दुसऱ्या नंबरवर असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. आता भारतात कोरोनाचा दुसरा डोस देण्यासही सुरुवात झाली आहे.

कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंद करणे गरजेचे आहे. आता पर्यंत ४५ वर्षावरील ६०,१७,८६२ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ३,१३,२२६ लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

error: Content is protected !!