ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र, पत्रात केले धक्कादायक खुलासे

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अंटालीया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीन कांड्या असणारी स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली होती. सध्या मनसुख यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती.

हिरने यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले आहे या मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे नमूद केले आहे.

पत्रात हिरने लिहितात की, या घटनेनंतर मला विक्रोळी पोलीस ठाणे तसेच नागपाडा एटीएस यांच्याकडून सतत चौकशीसाठी फोन आले. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. यादरम्यान बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत.

एका पत्रकाराने फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचे सांगितले. या सततच्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.

error: Content is protected !!