ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण, आम्ही अजून ताकदवान झालो – राकेश टिकैत

केंद्र सरकारने लागू केलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवरआंदोलन करत आहे. या आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यावर राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सहभागी झालेल्या शेतकऱयांचे मनापासून आभार मानले आहेत.

०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेसवे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी सकाळी राकेश टिकैत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस.. तोडगा निघेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार, असे ट्विट शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत देशभरातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. तसेच त्यांना संपूर्ण देशभरातुन पाठिंबा मिळत आहे.

error: Content is protected !!