ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा रद्द

महाराष्ट्र  : सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा राज्य सरकारच्या अडचणीत वाढ करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना मोर्चे, निर्दर्शने आणि गर्दी न जमावण्यासारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आव्हान केले होते.

आता या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र , वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात ९ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!