ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

फोटोसेशनसाठी लागवड नाही सुनंदाताई पवार यांचा स्वच्छतेबरोबर ग्रीन सिटी करण्याचा संकल्प नगरपरिषदेला दिले साडेपाच हजार झाडे

जामखेड – शहर स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी बारामती अँग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथून आणलेले विविध प्रकारचे साडेपाच हजार झाडे नगरपरिषदेला सपुर्त केले. सदर झाडे लावले तर वाया जाणार नाही यासाठी खबरदारी घेण्यासाठी प्लॅन तयार केला आहे केवळ फोटोसेशनसाठी झाडे लावली जाणार नाहीत तर ती जगली पाहिजे यासाठी रजिस्टर केले असून कोणी काय केले याचे मुल्यमापन केले जाणार असून झाडे जगली तर शहर हरीत शहर होणार आहे असा सल्ला सुनंदाताई पवार यांनी दिला.
आ. रोहीत पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी मागील तीन महिन्या पासून शहरात स्वच्छता अभियान लोकसह भागातून करीत आहेत. सुरवातीला प्रतिसाद कमी मिळाला नंतर नगरपरिषद निवडणूक हालचाल होताच इच्छुकांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांसह सहभाग घेऊन प्रभाग स्वच्छ करण्यासाठी पाऊल टाकले.
शहरातील स्वच्छता बरोबर निसर्गाचा समतोल रहावा यादृष्टीने सुनंदाताई पवार यांनी हैदराबाद येथून साडेपाच हजार विविध प्रकारचे झाडे मागीतली शनिवार दि. ६ रोजी अरोळे हॉस्पिटल येथे अयोजीत कार्यक्रमात त्यांनी सदर झाडे नगरपरिषद व कार्यकर्ते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना सुनंदाताई म्हणाल्या एकही झाड वाया जाणार नाही याची खबरदारी प्रशासन व कार्यकर्ते यांनी दखल घ्यावी तुम्ही झाडे घाईगर्दीत लावू नका तयारी करा खड्डे घ्या आणलेले माती व खत टाका मंग झाडे लावा व त्याला जाळी लावा सध्या उष्णता वाढत आहे हलगर्जीपणा करू नका फोटोसेशनसाठी झाडे लावू नका ही झाडे आपल्याला जपायची आहे. पुढचा आणखी स्टॉक येईपर्यंत ही झाडे जगवायची आहे. कोविड काळात डॉ. अरोळे हॉस्पिटलने रात्रभर जागून रुग्णांचे प्राण वाचवले व मृत्यूदर कमी केला त्यांचे ऋण आपण विसरणार नाही. या प्रकल्पात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला आहे व आ. रोहीत पवार यांनी येथे कार्यकर्त्यांसह श्रमदान केले आहे. झाडे कोणी लावले, ते सुरक्षित आहे का ती जगवली की नाही याबाबत स्वतंत्र रजिस्टर केले जाणार आहे व मुल्यमापन केले जाणार आहे.

यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, कर्जत जामखेड विधानसभा चे प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात, आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका शोभाताई आरोळे ,तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, उद्योगपती रमेश आजबे, विजय सेठ कोठारी ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले ,माजी प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक पवनराजे राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, कृषिभूषण रवींद्र कडलग, इस्माईल सय्यद ,अमोल गिरमे, युवा नेते महेश राळेभात, महिंद्र राळेभात, प्रवीण उगले ,प्राध्यापक राहुल आहेरे , अमित जाधव, कुंडल राळेभात, मधुकर महानोर सर, हरिभाऊ आजबे ,एडवोकेट ऋषी नेटके ,अमोल लोहकरे ,राष्ट्रवादीचे प्रसिद्धीप्रमुख काकासाहेब कोल्हे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!