ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा जामखेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा
जामखेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक
प्रशासनाला दिले निवेदन
जामखेड प्रतिनिधी

“आज दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज शंभर दिवस झालेत दिवस,ऊन,वारा,पावसाला तोंड देत शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत,तरीसुद्धा निष्ठुर केंद्र सरकार आंदोलनाची दखल घेत नाही हे कुठंतरी भारतीय लोकशाहीच दुर्दैव म्हणावं लागेल,यातून हाच बोध होतोय की भांडवलशाही व्यवस्था आणून इथला कष्टकरी शेतकरी ,कामगार वर्ग संपवन्याचा कुटील कारस्थान चालू आहे, म्हणून आज जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी असणारे काळे कायदे त्वरित रद्द करावे या मागणीसाठी अँड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला ,यातून शेतकऱ्यांच्या पाठीमागे वंचीत बहुजन आघाडी ताकदीने उभी आहे हा ठाम संदेश आम्ही
शेतकऱ्यांना देत आहोत.
यावेळी लोकअधिकार आंदोलनचे प्रवक्ते बापूसाहेब ओहळ,वंचीत बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत,जामखेड तालुका अध्यक्ष आतिष पारवे, बाळगव्हान चे सरपंच कृष्णा खाडे, उपसरपंच राहुल गोपाळघरे,विशाल पवार,अरुण डोळस, विशाल जाधव,ऋषिकेश निकाळजे,दिनेश ओव्हळ,बंटी आगे,कुंडल राळेभात,मच्छीन्द्र जाधव,मणेश ससाणे,अंकुश पवार,राकेश साळवे,दिपक माळी, आदी, उपस्थित होते.

error: Content is protected !!