ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी – नारायण राणे 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्धाघटन पार पडले होते. यावेळी मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेतला होता.

आता या टीकेला नारायण राणे यांनी ट्विट करून प्रतिउत्तर दिले आहे. राणे म्हणाले की, मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी.” असं नारायण राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण 

राणे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असता. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी टीका नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राणेंवर केली होती.

error: Content is protected !!