ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

जो पर्यंत सतेज पाटील घरफाळा भरत नाही तो पर्यंत कोणीही भरू नका – धनंजय महाडिक

कोल्हापूर जिल्हयात महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये विविध विषयावर शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यात आता घरफाळा मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. मंत्री सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.

प्रकरण असे की, पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या नावे डी.वाय.पी मॉलमध्ये गाळा आहे. या गाळ्यातील घरफळ्यात महापालिकेची १५ ते १६ कोटी रुपयांची फसवणूक लेण्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. या गाळ्यासंदर्भातील माहिती मंत्री सतेज पाटील यांनी लपवून ठेवली असा आरोपही लागण्यात आला आहे. या संदर्भात महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे जाहीर केली आहे.

तसेच सतेज पाटील यांनी येत्या दहा दिवसात फसवणूक केलेली ही रक्कम दंडासह वसूल करावी. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत सतेज पाटील पूर्ण घरफळा भरत नाहीत, तोपर्यंत इतर नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!