ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करा; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना

सातारा : यावर्षी चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध असून शेतीसाठी व पिण्यासाठी रोटेशनप्रमाणे पाण्याचे वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. याच्या वाटपाबाबत चांगल्या प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कॅनॉलच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी वाटपाच्या रोटेशनवर परिणाम होणार नाही यासाठी योग्य नियोजन करुन दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. तसेच शेतकऱ्यांकडील थकित पैशाच्या वसुलीसाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार अनिल बाबर यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.

error: Content is protected !!