ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा साकारण्यास सर्वतोपरी मदत – खासदार संभाजीराजे

कोल्हापूर  :महाविद्यालयात छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा पुतळा साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचा पुतळा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. राजाराम महाविद्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे बोलत होते. प्राचार्य आण्णासाहेब खेमनर यांनी महाविद्यालय परिसरात छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा उभारणीबाबतची माहिती दिली.त्याबाबतचा नियोजित आराखडाही सादर केला.पुतळा उभारणीसाठी समितीची स्थापना करण्यात यावी,अशी सूचना माजी विद्यार्थी (राजारामीयन) शशांक पाटील, श्रीकांत सावंत यांनी केली.

लोकसहभागामधून पुतळा उभारण्यात यावा,असे दीपक जेमेनिस,हेमंत पाटील यांनी सांगितले.त्यांनतर पुतळा उभारणीबाबत सर्वांनी सविस्तर चर्चा केली.यावेळी प्रवीण खडके,संजय सावंत,संजय पाठारे, डॉ.प्रवीण कोडोलीकर आदी उपस्थित होते. फ्लॉरेसमध्ये समाधी,पुतळा छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांनी प्रजाहितदक्ष राजा म्हणून राज्यकारभार केला.

कोल्हापूर संस्थांनामध्ये त्यांनी शिक्षणाच्या सुविधा दिल्या. इटली दौऱ्यावर असताना फ्लॉरेन्समध्ये यांचे निधन झाले.त्यांची समाधी पुतळा त्या ठिकाणी आहे त्यांनी स्थापन केलेल्या राजाराम महाविद्यालयात आता त्यांच्या पुतळा उभारण्याचा विचार माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने केला आहे.जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी देखील खासदार संभाजीराजे यांना पुतळा उभारणीबाबत विनंती केली आहे तसेच त्यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

error: Content is protected !!