ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वाघिरा ते स्मशानभुमिकडे जाणारा रस्ता जेसीबीने जागोजागी खड्डे खोदून अडवला ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत वाघिरा ते स्मशानभुमी-बोंबाळेवस्ती रस्ता शेतकरी देविदास निवृत्ती पाखरे या शेतक-याने 3 दिवसापूर्वी जेसीबी मशिनच्या साह्याने 3-4 फुट खोल व रूंद जागोजागी खड्डे खोदून अडवला असून बैलगाडी तसेच चारचाकी वाहन जाणे बंद झाल्यामुळे शेषेराव बन्सीधर बांगर माजी सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करून रस्ता पुर्ववत करून देण्याची मागणी केली असून ग्रामस्थांनी 3-4 वर्षापुर्वी लोकवर्गणीतून मुरूम टाकून हा रस्ता तयार केला होता.

सविस्तर माहीतीस्तव:-
लोकवर्गणीतून 3-4 लाख रूपये खर्चून केलेला, रस्ता :- जिवन बावणे, शेषेराव बांगर, राजेंद्र बांगर
______________________________ पुर्वीपार चालत आलेला लंबर बांध आहे, 3-4 वर्षापुर्वी आम्ही बोंबाळेवस्ती वरील ग्रामस्थांनी 3-4 लाख रूपये खर्च करून मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आहे, अचानकच खोदकाम केल्याने वस्तीवर तसेच स्मशानभुमीकडे वाहनाचा रस्ताच खड्डे खोदून बंद केल्याने ग्रामस्थ अडचणीत आले आहेत, आम्ही लोकवर्गणीतून रस्ता करण्यापुर्वी 1 लाख रूपये देण्याचे ठरले असताना आम्ही त्यांना तेव्हाच दीड लाख रूपये दिले आहेत,
आम्ही रीतसर जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना लेखी तक्रार केली असून तात्काळ रस्ता पुर्ववत न केल्यास आंदोलन करण्यात येईल.

रस्ता पुर्णपणे माझ्या शेतात, मला मावेजा दिला नाही, म्हणून रस्ता खोदला:- देविदास पाखरे
______________________________ देविदास पाखरे यांना विचारणा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार लंबर बांध सोडून संपुर्ण रस्ता माझ्या शेतात असुन मला वस्तीवरील ग्रामस्थांनी 4 लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु केवळ 50 हजारच रूपये दिले आहेत. म्हणूनच मी रस्ता अडवून धरला खोदून काढला,

महसुल प्रशासनाने भुमिअभिलेख द्वारे जमिन मोजून रस्तासिमा निश्चित करून द्यावा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
______________________________ देविदास पाखरे यांच्या म्हणण्यानुसार 4 लाख देण्याचे आश्वासन देण्यात आले होते,ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांना दीडलाख रूपये देऊन त्यांच्यासमोरच 3-4 वर्षापुर्वी रस्ता तयार केला होता, त्यांना एक लाख रूपये देण्याचे ठरले होते त्यांना दीड लाख रूपये दिलेले आहेत, सध्या त्यांनी जमिन गावातील एकाला विकली असून रजिस्ट्री झालेली आहे, आत्ता जमिन मोजून देताना अडचण येत असल्याने व रसत्यासाठी आम्ही फेरफार अडवल्यामुळे जाणीवपूर्वक रस्ता खड्डे खोदून अडवणुक केली आहे.
जिल्हाधिकारी, उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार यांना लेखी निवेदन देऊन मोजमाप करून जमिनीची सिमानिश्चिती करून रस्त्यासाठी आवश्यक ती चौकशी करून रस्ता पुर्ववत करून देणेबाबत निवेदन दिले आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!