ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा, मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करण्याची शक्यता?

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आतापर्यंत तृणमूल मधील अनेक बड्या नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात जाहीर प्रवेश करत आहेत . याशिवाय, अनेक सेलिब्रिटीही भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहे.

आता ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची चर्चा जोरदार होताना दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, त्यांच्याकडून किंवा भाजपाकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी रविवारी मिथून चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून समोर येत आहे.

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याशी मिथुन यांनी फोनवरून ही इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत.

error: Content is protected !!