ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले – खा. विनायक राऊत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प मुद्द्यावरून फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता. नाणार प्रकल्पाला शिवसेना पक्षाने पहिल्यापासूनच काठोर भूमिका घेऊन प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. आता याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचे मतपरिवर्तन का झालं, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

पुढे गंभीर आरोप लगावत राऊत म्हणतात की, नाणारमध्ये २२१ गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, असा आरोप करत याची मला कल्पना नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. आता राऊत यांच्या या टीकेला मनसे काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

error: Content is protected !!