ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून राज्य आणि देशातील मोठमोठे राजकीय पेच सोडवणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा डिनर घेतानाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला

मुंबई: डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून राज्य आणि देशातील मोठमोठे राजकीय पेच सोडवणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा डिनर घेतानाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत डिनर घेतानाचा हा फोटो नाही तर हा फोटो नसून हा पवार फॅमिलीच्या डिनरचा फोटो आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाच्या या सुखद क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तो खूपच व्हायरल होत आहे.

दिवाळी असो की पाडवा किंवा इतर कोणतेही सण-उत्सव वा समारंभ असो पवार कुटुंबीय प्रत्येक क्षण एकत्र येऊन आनंदात साजरा करतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी आणि गाण्याची मैफलही रंगते. त्यातून कुटुंबातील सुसंवाद चांगला राहतो. तसेच या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबाला एकत्र भेटण्याचा योगही मिळतो.

तीन पिढ्या एकत्र

सुप्रिया सुळे यांनी आता पवार कुटुंबाचा डिनर घेतानाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वत: शरद पवार, प्रतिभाताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे आणि पार्थ पवारांसह शरद पवार यांचे इतर नातवंडे दिसत आहे. डिनर सुरू होण्यापूर्वी डायनिंग टेबलवरचा हा फोटो आहे. या फोटोत कुटुंबातील एकूण 12 जण दिसत असून सर्वच जण कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. पवार कुटुंबाच्या एकूण तीन पिढ्यांचा हा फोटो आहे. फोटो काढताना हास्यविनोद झाल्याचं या फोटोतील सर्वांच्या चेहऱ्यावरून हसण्यातून दिसत आहे.

फोटो नेमका कुठला?

या फोटोत अजित पवार हे शरद पवारांच्या एकदम जवळ बसलले दिसत आहेत. अजित पवारांच्या देहबोलीवरून त्यांनी पवारांशी गंभीर विषयावर चर्चा केली असावी असं स्पष्ट दिसत आहे. हा फोटो नेमका मुंबईतील आहे की पुण्यातील याबाबत सुप्रिया सुळे यांनी काहीही माहिती दिलेली नाही. परंतु, फॅमिली डिनर एवढंच कॅप्शन या फोटोला देण्यात आलं. काल 6 मार्च रोजी रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्याला 116 लोकांनी रिट्विट केला असून 3881 जणांनी लाईक केलं आहे. तर, एकूण 8 जणांनी त्यावर कमेंट केली आहे.

‘तेरे मेरे सपने…. ‘

या आधी अजित पवार यांची बहीण, नीता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये पवार कुटुंबामध्ये संगीत मैफल रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यात नीता या कुटुंबीयांच्या साथीनं त्या ‘तेरे मेरे सपने…. ‘ हे गाणं गाताना दिसत होत्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

मेसेज देण्यासाठी फोटो?

सुप्रिया सुळे या नेहमीच कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. खासकरून एकत्रित कुटुंबाचा फोटो त्या आवर्जून शेअर करतात. तसेच सण-उत्सावातील कौटुंबीक प्रसंगही त्या शेअर करतात. त्यातून राजकीय संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याच्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दरम्यान पक्षावरील पकडीवरून वाद असल्याच्या आणि हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून एकमेकांचे स्पर्धक असल्याच्या वावड्या नेहमीच उठवल्या जातात. त्यातून पवार कुटुंबात काहीच अलबेल नसल्याचं दाखवण्याचा प्रकारही मीडियातून होत असतो. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीय एकसंघ आणि एका विचारानं एकत्रित असल्याचा मेसेज देण्यासाठीच सुप्रिया यांच्याकडून कुटुंबाचे फोटो व्हायरल केले जात असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

error: Content is protected !!