ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

राम मंदिर बांधणीसाठी जमा करण्यात येणाऱ्या देणगी मोहिमेला ट्रस्टकडून स्थगिती

नवी दिल्ली : भव्य राम मंदिराची उभारणी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून राम मंदिराच्या उभारणीसाठी जनतेकडून देणगी स्वीकारली जात होती. पण, त्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

आता या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर राम मंदिरासाठी आत्तापर्यंत अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

ANI शी बोलताना राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली असून जर लोकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी.

ज्यांना वर्गणी द्याची आहे त्यांनी ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने देऊ शकता. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण राम मंदिराची उभारणी येत्या ३ वर्षांमध्ये पूर्ण होईल.

error: Content is protected !!