ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला – नरेंद्र मोदी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून थेतील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यात अनेक नेत्यांच्या भव्य रॅली, प्रचार सभा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोलकत्त्यातील ब्रिगेड मैदानावर भव्य सभा होत आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली.

“मला पश्चिम बंगालला येण्याचे मला भाग्य लाभले. या मैदानाने अनेक देशभक्त पाहिले आहेत. तसेच या मैदानाने बंगालच्या जनतेला वेठीस धरणारे लोकसुद्धा पाहिली आहेत. बंगालच्या जनतेने परिवर्तनाची आस सोडली नाही. येथील जनतेने परिवर्तनासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्यांनी देशाचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली आहे.

हे माझे सौभाग्य आहे, की महिला दिनाच्या एक दिवस आधी बंगालमध्ये येण्याची संधी मिळाली पश्चिम बंगालने देशाला अनेक शूर महिला दिला. कोरोनाकाळात बंगालमध्ये अनेक महिलांना मोफत गॅसचे वाटप केला. तृणमूल काँग्रेसला पाणी, वीज अशा मूलभूत गोष्टींशी काही देणघेणं नाही. बंगालमद्ये दीड कोटी घरांमध्ये अजूनही पाणी येत नाही.

बंगालमध्ये आर्सेनिक युक्त पाणी अजूनही कित्येक लहाना मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी जो पैसा दिला तो पैसा ममता यांचे सरकार पूर्ण खर्च करु शकले नाही. अशा अनेक मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले होते.

error: Content is protected !!