ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे.

मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या सामन्यात रोहित आणि विराट आमनेसामने
या मोसमातील पहिला सामना हा गत विजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 56 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पार पडणार आहेत.

एकूण 6 शहरात सामन्याचं आयोजन
चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत.

एकूण 11 डबल हेडर मॅच
या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3. 30 वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

प्ले ऑफ आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये
14 व्या पर्वातील प्ले ऑफचे सामने (बाद फेरी) हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामनाही याच मैदानात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम सामना 30 मे ला पार पडणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

error: Content is protected !!