ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

शिवशारदा मल्टीस्टेट अर्थसंजीवनी ठरणार – ह.भ.प. महादेव महाराज पुरी

शिवशारदा मल्टीस्टेट अर्थसंजीवनी ठरणार – ह.भ.प. महादेव महाराज पुरी
======================
सिरसदेवीत शिवशारदा मल्टिस्टेट शाखेचा भव्य शुभारंभ
===================≠===
गेवराई दि.७ ( प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित कुटुंबीयांनी सहकार आणि बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनाखाली शिवशारदा मल्टीस्टेटने अल्पावधीतच आर्थिक क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. सामान्य नागरिकांबरोबरच ठेवीदारांचा विश्वास प्राप्त केल्यामुळे शिवशारदा मल्टीस्टेट नावारूपाला आली असून सिरसदेवी आणि परिसरातील नागरिक आणि व्यापारी बांधवांना ती अर्थसंजीवनी ठरणार आहे असे कौतुकास्पद उदगार पंचमुखेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज पुरी यांनी काढले. शिवशारदा मल्टीस्टेटच्या सिरसदेवी शाखेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

बीड येथील शिवशारदा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या सिरसदेवी शाखेचा शुभारंभ रविवार दिनांक ७ मार्च रोजी पंचमुखेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज पुरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, अँड. हनुमंत शिंदे, झुंबर निकम, शेख मिन्हाज, श्रीकिसन कोळपे, केशव जाधव, मनोहर सोळुंके, कैलास नांदे, दत्तात्रय मगर, नगरसेवक राधेश्याम येवले, बंडू मोटे, अवेज शरीफ, दिपक आतकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी बाजार समितीचे उपसभापती शामराव मुळे यांनी सपत्निक पूजा केली. उपस्थित मान्यवरांनी नुतन शाखेस शुभेच्छा दिल्या. यावेळी सिरसदेवी आणि परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच शिवशारदा मल्टिस्टेटचे कार्यकारी मंडळ, कर्मचारी वृंद आदी उपस्थित होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.

error: Content is protected !!