ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरु होऊन 100 दिवस उलटले आहेत. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आज 7 मार्च आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तसेच सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कृषी कायदे जबाबदार असल्याचं म्हटलं. मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. माझी शेवटची इच्छा कृषी कायदे मागे घ्यावी अशी आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, असंही या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे

आत्महत्या करणारा शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील होता. त्यांनी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या 49 वर्षीय शेतकऱ्याने कथितपणे एक सुसाईड नोट लिहिली आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरुच आहे. हे आंदोलन सुरु होऊन तब्बल 100 दिवस उलटले आहेत.

बहादुरगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विजय कुमार म्हणाले, “पीडित शेतकरी राजबीर हे हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते.” काही शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकताना पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, “माझ्या आत्महत्येच्या निर्णयाला तिन्ही कृषी कायदे जबाबदार आहेत. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेऊन माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी.”

आंदोलक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंच

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या हरियाणाच्या जींदमधील एका शेतकरी आंदोलकाने मागील महिन्यात टिकरी बॉर्डरपासून 2 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी हरियाणातील एका शेतकऱ्याने टिकरी बॉर्डरवर विष पिऊन आत्महत्या केली होती. त्याचा नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये पंजाबमधील एका वकिलाने टिकरी बॉर्डरवरील आंदोलनापासून काही किलोमीटरवर विष पिऊन आत्महत्या केली होती.

error: Content is protected !!