ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गुगलने महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांना दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : ८ मार्च हा सर्वत्र जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे महत्व मानून गुगलने अनोख्या पद्धतीचे डुडल साकारले आहे. या डुडलच्या माध्यमातून गुगलने जगभरातील सर्व नारीशक्तीचा सन्मान केला आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने गुगल व्हिडिओद्वारे हे खास डुडल बनवण्यात आले आहे. ज्यात अॅनिमेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दाखवल्या आहेत. यात विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. या गुगलने डुडलच्या माध्यामातून महिला शक्तीचा सन्मान केला आहे.

गुगलने महिला दिनानिमित्त साकारलेल्या डुडलमध्ये सुरुवातीला काही महिलांचे हात एकमेकांच्या हातात दिसत आहेत. त्यानंतर जगभरातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे हात दाखवण्यात आले आहेत. या डूडलमध्ये महिलांच्या हातांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात महिलांचे पहिले मतदान, विज्ञान क्षेत्रातील काम, लेखिका, प्रवक्त्या, निवेदिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला दिसत आहे.

error: Content is protected !!