ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

शेतकरी बाजाराला वेगळा न्याय आणि दिशा पटानीला वेगळा, नितेश राणे यांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी सुरु केलेल्या शेतकरी आठवडी बाजाराला वेगळा न्याय आणि लॉकडाऊनचे नियम तुडवत वरळीत अभिनेत्री दिशा पटनीची शुटींग सुरु असते, तिला वेगळा न्याय ही तर सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

प्रकरण असे की, मुंबईत आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्यात आला होता. मात्र मुंबई महानगरपालिका हा आठवडी बाजार बंद करण्याचा कट रचत असल्याचा आरोप लाड यांनी लगावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

यावर बोलताना राणे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकारमध्ये दोन प्रकारचे न्याय आहेत. पब आणि बारसाठी वेगळा तर शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय. वरळीत पब सुरु आहे, बांद्रयात बार सुरु आहेत. पण यांना शेतकऱ्यांसाठी सुरु असलेला आठवडी बाजार बंद करायचा. जर हे सरकार शेतकऱ्यांच्या कामी येत नसेल तर हे सरकार हवं कशाला, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी सरकारवर सडकून टीका केली.

 

error: Content is protected !!