ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई, :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त समस्त स्त्रीशक्तीला वंदन करून, राज्यातील माता-भगिनी आणि बंधूंनाही ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत. महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती हा वारसा अधिक समर्थपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे.

महाराष्ट्राच्या गाव-खेड्यात राहणाऱ्या, शेतामध्ये कष्ट करणाऱ्या, शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता-भगिनींच्या त्यागाचे स्मरण करून, राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

error: Content is protected !!