ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क उभारण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचे अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडला होता. आज महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देऊन अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरवात केली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

सध्याच्या काळात देशात जाणीवपूर्वक फसव्या विज्ञानाचा प्रचार होत आहे. हा छद्म विज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क उभारण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.

सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रचार होत आहे. अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली आहे.

error: Content is protected !!