ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

महिलेच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अर्थमंत्री अजित पवारांचं मोठी घोषणा 

 

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी आज सभागृहाच्या पटलावर राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. यावेळी त्यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपला अर्थसंकल्प सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी राज्याच्या जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी महिला दिनानिमित्त त्यांनी मोठं गिफ्ट दिले असून महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी ८ मार्चचे महत्व सांगितले होते. आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचे नाव असावे ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे.

तसेच “तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे. कोणतंही कुटुंब यापुढं राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृहखरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली होती.

error: Content is protected !!