ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

गोवा विधानसभेत शिवसेना स्वबळावर लढवणार २५ जागा, संजय राऊत यांची घोषणा

गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणार आहेत. गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांवर उमेदवार आपले भवितव्य आजमावतील. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, गोव्यात शिवसेना जवळपास २० ते २५ जागा लढवणार आहे. यामुळे शिवसेना गोव्यात भाजपाची कोंडी करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेने नुकतेच पश्चिम बंगालमध्ये आपले उमेदवार उतरवण्याचे स्पष्ट केले होते, मात्र उमेदवार रिंगणात न उतरवता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मात्र आता गोवा विधानसभेकडे शिवसेनेने मोर्चा वळवला आहे, त्यामुळे भाजपाला जास्त कसरत करावी लागणार आहे.

खासदार संजय राऊतांनी सांगितले की, ‘मगो आणि गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून शिवसेनेने गेल्या वेळी निकडणूका लढवल्या होत्या. युतीमध्ये केवळ ३ जागा आमच्या वाटेला आल्या होत्या, कारण युती म्हटलं की मर्यादा येत असतात आणि पक्ष विस्तारावर देखील मर्यादा येतात. त्यामुळे यावेळी आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, जवळपास २५ जागांवर आमचे उमेदवार असतील, त्यापैकी १० ते १५ ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले असून उर्वरित ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अद्याप बाकी आहे.’

error: Content is protected !!