ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

अर्थसंकल्पातून राज्याच्या हाती निराशा, फडणवीसांची राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असून याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचे की काही विशिष्ट भागाचा म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पातून निराशा झाल्याचे म्हणाले आहेत.

याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा की विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प हा प्रश्न आहे. या अर्थसंकल्पाने पूर्णपणे निराशा केली आहे. या अर्थसंकल्पातून प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही.

तसेच शेतकऱ्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब आहे. महाराष्ट्रात ८० टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पायाभूत सुविधा एकतर सुरू असलेले प्रकल्प आहेत किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत. रस्ते, सिंचन, रेल्वे, कुठलेही क्षेत्र घ्या.. कुठल्याही योजना केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्यांनी जाहीर केल्या ठीक आहे, पण हे सांगायला सरकार विसरले, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

error: Content is protected !!