ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात की ,

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. विशेष करून महिला दिनाचे औचित्य सोडून महिलांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिला, शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या असून काही विकास प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पावर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आजच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

“कोरोना काळातही राज्याच्या प्रगतीला अतिशय पूरक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात पर्यावरण पूरक विकास आणि पर्यटन विकास साधण्यासाठी अर्थसंकल्पात प्रभावी तरतुदी केल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

महिला, शेतकरी, युवक अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी, ग्रामीण व शहरी, २१ व्या शतकाच्या नव्या महाराष्ट्रासाठीचा हा अर्थसंकल्प असून नक्कीच आपले राज्य पुरोगामी असल्याचे आज दाखवून दिले आहे आणि ह्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करतो असे ट्विट त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!