ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आदर्श मातांचा इतिहास आजच्या माता-भगिनींनी वाचला पाहिजे – राजेश दिवटे सर

आदर्श मातांचा इतिहास आजच्या माता-भगिनींनी वाचला पाहिजे – राजेश दिवटे सर

बीड प्रतिनिधी अंकुश गवळी

आज आठ मार्च जागतिक महिला दिन खरं तर महिलांसाठी आजचा एक विशेष दिन आहे. आजच्या दिवशी आपल्याला आदर्श माता ची आठवण होते .
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, कर्मयोगिनी राजमाता अहिल्याबाई होळकर,कल्पना चावला,झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रतिभाताई पाटील,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ खरं तर या सर्व मातांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे.
पण खरं म्हटलं तर वर्तमानामध्ये काही माता सोशल-मीडियाच्या आहारी गेलेल्या दिसुन येत आहेत तसेच ,पाश्चात्य देशाचं अनुकरण करून माता-भगिनी अंगावर अर्धनग्न कपडे परिधान करतांना दिसत आहेत, हे चित्र पाहताना प्रचंड वाईट वाटतं खरं तर आज माता जिजाऊ असत्या तर त्याना प्रचंड वाईट वाटलं असतं.
मुली शिकल्या,प्रगती झाली प्रगतीला विरोध नाही,पण प्रगतीच्या नावाखाली इतर देशांचे अनुकरण करून चुकीचे वागणे बरोबर नाही.
आती प्रगती होण आपल्या संस्कृतीला घातकच होताना दिसून येत आहे. आज अर्धनग्न कपडे परिधान केल्यामुळे स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते यामध्ये चूक कोणाची आहे ? त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची का ? त्या महिलांची हे तुम्हीच ठरवा?पण अशा वागण्यामुळे आज समाजामध्ये बलात्काराचे प्रमाण वाढत आहे,विनयभंगाच्या तक्रारी वाढत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे.!
म्हणून मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपली पायरी सोडून वागता कामा नये,पण असं चित्र फार कमी वेळेस पाहायला दिसून येत आहे.
परंतु एकीकडे आमच्या माताभगिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत.
भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान असे सर्वोच्च पद देखील महिलांनी भूषवलेली आहेत. खेळामध्ये ,समाजकार्यामध्ये महिला सर्वात पुढे आहेत.

सांगेन मी जगाला,घेऊन एक तारी
सर्वातश्रेष्ठ आहे,ही भारतीय नारी
वळणे कित्येक तिजला,वाटेखाच खळगे
सरहद्दपार करते, ही भारतीय नरी

खर तर या आदर्श महिलांना पाहून आज आमच्या ज्या माता-भगिनी आपलं कार्य करत आहेत, आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून समाजासमोर एक आदर्श दाखवून देत आहेत, त्या सर्व माता-भगिनींना आज महिलांनादिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

error: Content is protected !!