ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

लोणी सय्यदमीर येथील विष्णू पवार भारतीय सैन्य दलातुन सेवानिवृत्त गावकऱ्यांनी केला सत्कार

लोणी सय्यदमीर येथील विष्णू पवार भारतीय सैन्य दलातुन सेवानिवृत्त गावकऱ्यांनी केला सत्कार
प्रतिनिधी/आष्टी
आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर श्री.विष्णू उर्फ बापूराव विठोबा पवार हे निवृत्त झाल्याबद्दल लोणी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.लोणी सय्यदमीर तालुका आष्टी येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्यदलामध्ये बत्तीस वर्ष अविरत सेवा करून सुभेदार मेजर या मोठ्या महत्त्वाच्यापदावरून काल दिनांक.2.3.2021 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त आज लोणी सय्यदमीर येथील ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आबा वाळके व माजी सरपंच बाजीराव वाळके यांचे हस्ते भागवत ग्रंथ,शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे गावातील ह भ प,रामदास महाराज रक्ताटे,ह भ प बाबा महाराज वाळके,सरपंच रेनकू बेलेकर,पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष वाळके,पोलीस पाटील बाबासाहेब पाटील निंबाळकर,ग्रा.प.स. संतोष पाटील वाळके,माजी सरपंच उद्धव पाटील वाळके,भिवा सासवडे,संतोष व्यवहारे,मोहन वाळके,सोमनाथ मेजर बेलेकर,निळकंठ रक्ताटे,गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तात्या वाळके यांनी केले तर आभार सरपंच रेनकू बेलहेकर यांनी मानले.याप्रसंगी सुभेदार मेजर बापूराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की भारतीय सैन्य दलामध्ये काम करण्यासाठी मला मोठे भाग्य लाभले.देशाच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना,भारतीय सैन्य दला मध्ये जाण्याचा योग ज्यांच्या नशिबी येतो ते खरच पुण्यवान असतात या देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभलं याच्यासारखा दुसरा आनंद जीवनात कोणताही असू शकत नाही.
गावातील तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की तरुणांनी,व्यायाम करून व्यसनाच्या आहारी न जाता शरीर संपत्ती मजबूत करून देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यदलामध्ये भरती झाले पाहिजे.भारतीय सैन्यदलामध्ये भरपूर संधी आहेत या संधीचा युवकांनी योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गावाचे आपल्या देशाचे नाव रोशन करावे.जय हिंद.

error: Content is protected !!