ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

अँटिलिया स्फोटकं प्रकरणी तपास एनआयए’कडे उद्धव ठाकरे यांचे केंद्रावर गंभीर आरोप

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे सोपवला होता. हा निर्णय घेतलेला असताना आज हा तपास एनआयएकडे देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्याने त्यावर राज्य सरकारमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत

यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा तपास एटीएस’कडे देण्यात आलेला असताना या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह पार्क करण्यात आलेली कार आणि संबंधित कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही घटना सध्या चर्चेत आहेत. या दोन्ही घटनांचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांची मागणी मान्य केली होती. दरम्यान, अवघ्या तीनच दिवसांत यातील अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एनआयएकडे देण्याचे आदेश आज केंद्राकडून देण्यात आले आणि वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद निर्माण होताना दिसून येणार आहे.

error: Content is protected !!