ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या, या शिवसेना खासदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई  : काही दिवसांपूर्वी मुंबई येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केलेले खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईडची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी तसेच डेलकर यांची सुसाईड नोट प्रसिद्ध करावी अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. खासदार गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर त्यांनी डेलकर आत्महत्येवर प्रतिक्रिया दिलेली आहे. गावित म्हणाले की, मोहन डेलकर यांच्या कामात प्रशासनाने अडथळा आणला होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप गावित यांनी केला आहे.

पुढे बोलताना गावित म्हणाले की, डेलकर यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यामुळे राज्य सरकारने उच्च स्तरीय समिती नेमावी किंवा सीआयडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असं गावित यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता डेलकर प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!