ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील या भागात कडक लॉकडाऊन

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात मुंबई पाठोपाठ ठाणे आणि नवी मुंबई शहरात सुद्धा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभामीवर ठाणे शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून या भागातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आदेश जारी केला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूने खलील हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये आजपासून ३१/०३/२०२१ पर्यंत ‘लॉकडाऊन’ सुरू करण्यात येत आहे. हॉटस्पॉट क्षेत्रांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांमध्ये यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांप्रमाणे मिशन बिगीन अगेन सुरू राहील असे ट्विट ठाणे मनपाच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती देण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!