ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

ग्रामीण भागातील विकास कामांच्या दर्जाबाबत तडजोड करणार नाही -अमरसिंह पंडित

ग्रामीण भागातील विकास कामांच्या दर्जाबाबत तडजोड करणार नाही -अमरसिंह पंडित
===========================
अमरसिंह पंडित यांच्या हस्ते कांबी येथे रस्ता कामांचा शुभारंभ
===========================
गेवराई दि.९ (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विकास कामांसाठी आपण सतत प्रयत्न करत असून कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. रस्ता, पाणी आणि आरोग्य आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून ग्रामस्थांनी आपल्या भागाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कांबी (पेंडगाव) येथे कांबी ते कदम वस्ती या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कांबी (पेंडगाव) येथे मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कांबी ते कदम वस्ती या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या संदर्भातील सर्व अटी, नियम व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

यावेळी कांबी ग्राम पंचायतचे सरपंच वसुदेव पिसाळ, उपसरपंच जगन्नाथ भडके, पांडुरंग रहाडे, महादेव रहाडे, लक्ष्मण घोरपडे, कैलास कदम, संतोष घोरपडे, रामेश्वर भडके, गुणाजी शिंदे, गोरख भडके, रामेश्वर रहाडे, आनेराव लहू, आनेराव अंकुश यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!