ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही मात्र……., मनपाचा गंभीर इशारा

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. यावर आता मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भाष्य करत गंभीर इशारा दिला आहे.

मुंबईकरांवर सध्या तरी लगेच लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत काल २३ हजार कोरोना चाचण्या झाल्या. याआधी म्हणजे जानेवारीपर्यंत १० ते १२ हजार चाचण्या व्हायच्या. त्या आता सातत्यानं वाढवत नेत आहेत. मुंबईत दर १०० चाचण्यांमागे केवळ ६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत.

error: Content is protected !!