ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

सभापती कानगुडेंनी मांडला वर्षपूर्ती निमित्त कामाचा लेखाजोखा.

सभापती कानगुडेंनी मांडला वर्षपूर्ती निमित्त कामाचा लेखाजोखा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कर्जत | प्रतिनिधी.
एक वर्ष पूर्ती निमित्त सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या एक वर्षाच्या काळात विविध विभागाच्या वतीने तालुक्यात खर्च झालेल्या निधीचा लेखा जोखा पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर मांडला.
कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी सौ अश्विनी कानगुडे यांनी पत्रकार परिषद घेत 7 मार्च 2020 रोजी आपली सभापती पदी निवड झाली तर दि 10 मार्च 2020 रोजी मी पदभार स्वीकारला आपल्या सभापती पदाच्या एक वर्षाच्या काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला तसेच अडीअडचणी सोडविण्यात यश आले.या कामी विश्वस्त श्रीमती सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह सर्व विभागाचे सहकार्य लाभले आहे. आगामी काळात उर्वरित कामे मार्गी लावणार आहे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कांनगुडे यांनी केले.
आपल्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडताना सार्वजनिक कामांसाठी सव्वीस कोटी, जलसंधारण कामासाठी चौदा कोटी, विविध घरकुल योजनेसाठी बावीस कोटी चौदा लाख, रोजगार हमी योजनेतील विविध कामांसाठी दहा कोटी, कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी चार लाख एकेचाळीस हजार रुपये निधी आणण्यात यश आले. समाज कल्याण विभागाच्या वतीने एकशे सतरा गरजूंना जीवनावश्यक नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. दलित वस्ती सुधार योजनेत नऊ कोटी तर पशु विभागाच्या वतीने मोठा निधी लाभार्थ्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तीर्थक्षेत्र विकास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, समाज कल्याण विभाग, मुख्यमंत्री पेयजल योजना, पंतप्रधान आवास योजना, जिल्हा परिषद सेस मधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भरीव मदत, कृषी विभागाकडून पात्र लाभार्थ्यांना कडबा कुट्टी, बायोगॅस लाभ दिला आहे. कर्जत पंचायत समिती हिरवी करण्यासाठी कार्यालयात व बाहेर सुशोभीकरण करण्यात आले, रोजगार हमी तील विहिरीसाठी पाठपुरावा केला, पंचायत समिती व जिल्हा परिषद जागेत शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी आपण आ रोहित पवार यांच्या कडे पाठपुरावा केला आहे. कोरोना काळात आशा सेविका पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला, याकाळात सतत कार्यरत राहून समाजातील सर्व घटकांंना न्याय द्यायचे काम केले.
आगामी काळात संधी मिळाली तर असेच चांगले काम करणार आहे, कामाची जिद्द आहे अनेक प्रश्नावर काम करायचे आहे, पंचायत समिती आपल्या दारी ही संकल्पना मी राबवून सर्वसामान्यांची कामे त्याच्याच गावात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या कामात आ रोहित पवार, त्याच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांनी मोलाची मदत केली, मार्गदर्शन केले. याशिवाय माझे पती श्याम भाऊ कानगुडे यांनी पूर्ण मोकळीक दिली कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही. सभापतीच्या गाडीत ही ते कधी बसले नाहीत की सभापतींच्या खुर्चीत ही बसले नाहीत. याशिवाय गटविकास अधिकारी अमोल जाधव व इतर पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे आवर्जून सांगितले.
आमदार रोहित पवार यांचे कडे निवेदन देत रेहेकुरी अभयारण्यात प्राणी आणि पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, राशीन,कर्जत व मिरजगाव येथे मुलींसाठी आधुनिक व्यायाम शाळा उभारणी करणे, तसेच महिलांसाठी स्वयंसहाय्यता प्रशिक्षण केंद्र उभारणे व कष्टकरी जनतेसाठी मोफत अन्नछत्र सुरू करणे, बारामती येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क तसेच वसतिगृह फी मध्ये सवलत मिळणे, महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप व व्हेडिंग मशीन उपलब्ध करणे , दारूबंदी, महिला बचतगट व स्वावलंबी बनविणे यासह विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. आगामी काळात काळात आ रोहित पवार जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार असून पुढे ही संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!