ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मुंबईतील फेरिवाल्यांसाठी पंतप्रधानांंची स्वनिधी योजना पुन्हा राबविणार.

मुंबईतील फेरिवाल्यांसाठी पंतप्रधानांंची स्वनिधी योजना पुन्हा राबविणार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची मागणी मान्य.

▪️मुंबई | प्रतिनिधी.
दि. 9 मार्च 2021
फेरिवाल्यांना दहा हजार रुपयांची कर्ज मदतीची पंतप्रधान स्वनिधी योजना मुंबईत पुन्हा राबविण्यात येईल अशी असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानसभेत आज फेरिवाल्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील फेरिवाल्यांचा विषय मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरिवाल्यांना स्वनिधी योजना सुरु केली होती. मात्र मुंबई पालिका आयुक्त़ांनी त्याला.सध्या स्थगिती दिली आहे. कोरोना काळात फेरिवाल्यांना असंख्य अडचणींंचा सामना करावा लागला त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे ही योजना सुरु करा. अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना पुन्हा सुरु करण्यात येईल असे सांगितले.

error: Content is protected !!