ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

भाजपच्या ७५ वर्षीय नगरसेवकाला मारहाण, चौघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

मिरभाईंदर : भारतीय जनता पक्षाचे मीरा भाईंदर महानगर पालिकेचे जेष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना किरकोळ वादातून चार अल्पवयीन मुलांनी मारहाण केली आहे. रस्त्यावरून बाईक वेगाने चालवण्यावरून रोखल्यामुळे चार अल्पवयीन मुलांनी लाथाबुक्यांनी पाटील यांना मारहाण केली आहे.

सदर घडलेल्या प्रकरणावरून पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. पाटील यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रोहिदास पाटील हे पत्नी, सून, नातू, नात अशा परिवारासोबत राहतात. भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क परिसरात नगरसेवक रोहिदास पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी ते गेले असता सदर हा प्रकार घडला.

रोहिदास पाटील गेटवर उभे असताना तीन मुलं लाल रंगाची स्कूटीवर भरधाव वेगाने वाकडी-तिकडी चालवत असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे पाटलांनी त्यांना हटकून वेगाने गाडी न चालवण्यास सांगितलं. त्यावेळी चिडलेल्या एका तरुणाने “तेरे बाप का राज है क्या, तू हमे बोलनेवाला कौन हे, तू तेरा देख, मै मेरा देखता हू” अशा शब्दात उत्तर दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!