ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड 19 रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ, :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

_____________________________
जिल्हाप्रशासनाने कोरोनाचा बीड जिल्ह्य़ातील वाढता प्रभाव पाहता प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ केला असून त्यानिमित्ताने आज दि.9 मंगळवार रोजी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष स्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य लिंबागणेश गट राजेंद्र मस्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, डाॅ.गणेश ढवळे ,उपसरपंच शंकर वाणी, ग्रां.पं.सदस्य गणेश लिंबेकर, तसेच पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड, सचिन कदम, लखन राऊत व लसीकरणासाठी आलेले रूग्ण उपस्थीत होते.

भालचंद्र गिरे, लसिकरण प्रमाणपत्राचे पहिले मानकरी:- डॉ. रूपाली राऊत, वैद्यकीय आधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश
______________________________ जिल्हाप्रशासनाने 45 वयोगटावरील नागरीकांना प्राधान्यक्रम देऊन कोविड लसीकरण देण्यास सुरुवात केली असून लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण ऑनलाइन 70 लोकांचे रजिस्ट्रेशन झाले असून त्यापैकी दिवसभरात 54 लोकांना लसीकरण करून प्रमाणपत्र देण्यात आली. या लसीकरण मोहीमेत भालचंद्र गिरे यांना लसीकरण मोहीमेत प्रथम प्रमाणपत्र मिळवल्याचा मान मिळाला आहे
.
लसिकरणाचा लाभ घ्यावा:- राजेंद्र मस्के ,भाजपा जिल्हाध्यक्ष
____________________________
_ लसीकरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष भाजप तथा जिल्हापरीषद सदस्य लिंबागणेश यांनी गटातील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत लसीकरणाचा लाभ घेऊन कोरोनाच्या लढाईत पुढाकार घेण्याचे आवाहन केले ,

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी-कर्मचा-यांना सहकार्य करण्याचे आवाहन:- स्वप्निल गलधर भाजपा तालुकाध्यक्ष
______________________________ सध्या मराठवाड्यासह बीड जिल्ह्य़ात कोरोनाच्या रूग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी-कर्मचारीयांना सहकार्य करत प्रत्येक ग्रामस्थांनी आपले कर्तव्य, आपली जबाबदारी समजून लसीकरण अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!