ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पाकिस्तानला मिळणार सिरमकडून चार कोटी कोरोना लसीचा डोस

भारताबरोबर इतर देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. त्यात पाकिस्तानमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. त्यात आर्थिक स्थिती खराब असलेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. इतकेच काय तर लास खरेदी करण्याइतकी सुद्धा पाकिस्तनाची परिस्थिती खराब आहे.

त्यात आता करोना संसर्गाशी दोनहात करण्यासाठी पाकिस्तानला ४.५ कोटी करोना लशीचे डोस मिळणार आहे. करोना लशीचे डोस भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केल्या आहेत. ‘गावी’च्या माध्यमातून पाकिस्तानला या लशी मिळणार आहेत.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला भारतात बनवण्यात आलेली सिरमने तयार केलेली करोना लस या महिन्यात मिळणार आहे. पाकिस्तानमध्ये याआधी चीनने दिलेल्या करोना लशीने लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत २७.५ दशलक्ष लोकांना करोनाची लस देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पाकिस्तान सरकारने याआधीच यावर्षी एकही लस खरेदी करणार नसल्याचे म्हटले होते. करोनाशी लढण्यासाठी पाकिस्तान हर्ड इम्युनिटी आणि चीन व कोवॅक्सकडून मदत म्हणून मिळणाऱ्या लशीवर अवलंबून असणार आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असून मागील काही वर्षांमध्ये कर्जाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांवर दरडोई एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ४६ टक्के कर्ज हे इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर वाढले आहे.

error: Content is protected !!