ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये, संजय राऊत यांचे विरोधकांना आव्हान

सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपानंतर आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. आता त्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा फडणवीसांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचे काम कसे चालते हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला तसेच मुनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे करू नका असे आवाहनही राऊतांनी विरोधकांना केले आहे.

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत.

तसेच विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्यासारख आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

error: Content is protected !!