ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सचिन वझे जावई आहे का ? विचारणाऱ्या प्रवीण दरेकरांना डॉ नीलम गोऱ्हे यांची सडेतोड उत्तर

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हाच मुद्धा पकडून राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला होता. त्यातच सचिन वझे हा सरकारचा जावई आहे का? असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. दरेकरांच्या या टोल्याला शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच टोला लगावला होता.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “कायदा सुव्यवस्थेवर प्रस्ताव असून गृहमंत्री उत्तर देणार आहेत. तुम्ही बोलण्याच्या ओघात तो तुमचा जावई आहे का? असं म्हणालात. माझं असं मत आहे की जावई आरोपी असला तर त्यालाही सोडता कामा नये”. असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जावईंच्या बाबतीत वेगळी वागणूक देणारं हे महाविकास आघाडी सरकार नाही असे आमचे निरीक्षण आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला होता.

तर यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं देशमुखांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!