ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

अनिल देशमुख आणि अशोक चव्हान यांच्यावर हक्कभंग आणण्यासंदर्भात फडणवीसांची सभागृहात मागणी

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने विविध मुद्यावरून आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मनसुख हिरेन प्रकरण, संचित वांझे, वाढत असलेली रुग्णसंख्या तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यावरून आघाडीला कैचीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात होता.

त्यात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली आहे.त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहे.

फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात माझ्याविरोधात धादांत खोटी माहिती दिली. नाईक यांचे प्रकरण मी दाबलं, असा उल्लेख त्यांनी केला. मी त्यांना यासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवला होता. तरीही अनिल देशमुखांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले. हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांनी खोटं बोलून माझ्या विशेष अधिकाराचे हनन केले. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत खोटी माहिती दिल्यामुळे आपण त्यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली. अ‍ॅटर्नी जनरलांनी जी माहिती दिली नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.

error: Content is protected !!