ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं

डेहराडून: उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आजच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून आजपासून त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. कसे आहेत नवे मुख्यमंत्री? या पदापर्यंत ते कसे पोहोचले?, तीरथ यांच्या पत्नी डॉ. रश्मी त्यागी रावत यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचा उलगडलेला हा प्रवास…

राजकारणी असूनही वेगळा विचार करतात

डॉ. रश्मी त्यागी रावत यांनी तीरथ सिंह रावत हे सर्वांपेक्षा निराळे असल्याचं म्हटलं आहे. मी जे आहे ते आहे. लोकांना दाखवण्याची गरज नाही, असं ते नेहमी सांगतात. ते इतके साधे आहेत की त्यांच्या गाडीला कोणतीही नेमप्लेट लावलेली नाही. कोणताही बडेजाव नाही. त्यांच्या या कॅरेक्टर स्टिक्समुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. एक राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळा विचार करतात. ते नेहमी जमिनीवर असतात. हीच त्यांची सर्वात मोठी क्वालिटी आहे, असं रश्मी म्हणाल्या.

संघ प्रचारक

महाविद्यालयीन जीवनापासूनच तीरथ सिंह रावत हे विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते. हेमवंती नंदन गढवाल विश्वविद्यालयात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते उत्तराखंडच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री झाले. तसेच राष्ट्रीय मंत्रीही राहिले. 1983 ते 1988 संघाचे प्रचारक होते. 1997मध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेवर ते निवडून गेले. विधानसपरिषद सदस्य म्हणून अनेक समित्यांवर त्यांनी काम केलं. 2007मध्ये त्यांची उत्तराखंड भाजपच्या प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते प्रदेश निवडणूक अधिकारी होते. 2012मध्ये रावत चौबटाखाल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2013मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. सध्या ते भाजपचे खासदार आहेत.

आमदारकीचं तिकीट कापलं

उत्तराखंडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीवेळी अंतर्गत कलहामुळे रावत यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं नाही. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. अशावेळी भाजपच्या नेत्यांनी उत्तराखंडची कमान रावत यांच्या हाती सोपवली आहे. राज्याच्या राजकारणात रावत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनच पाहिलं गेलं. पण पक्षांतर्गत राजकारणात टिकू न शकल्याने त्यांना कायम डार्क हॉर्सचीच भूमिका पार पाडावी लागली.

अमित शाहांचे निकटवर्तीय

तीरथ सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमित शाह यांनी 2016 – 17 मध्ये देशातील विविध भागात 120 दिवस यात्रा केली होती. तेव्हा तिरथ सिंह रावत हे त्यांच्यासोबत कायम होते. 2017 मध्ये जेव्हा तिरथ सिंह यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तेव्हा अमित शाह यांनी त्यांना हिमाचल प्रदेशात भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तीरथ सिंह यांना गढवालमधून तिकीट दिलं आणि ते संसदेत पोहोचले. गढवाल लोकसभा मतदारसंघ व्हिआयपी मानला जातो. कारण याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बीसी खंडुरी निवडणूक लढवतात.

error: Content is protected !!