ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

राहुल गांधी यांनी कन्याकुमारीतील एका 12 वर्षीय मुलाला एक शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसात आपल्या राजकीय नाही तर अन्य गोष्टींमुळे जास्त चर्चेत आहेत. मग तो समुद्रात उडी घेत लुटलेला पोहण्याचा आनंद असो की, विद्यार्थ्यांसोबतच्या संवादाच्या कार्यक्रमात मारलेले जोर. आता राहुल गांधी अजून एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीतील एका 12 वर्षीय मुलाला एक शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला आहे.

राहुल गांधी यांनी एन्टनी फेलिक्स या मुलाला स्पोर्ट्स शूज देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राहुल गांधी यांनी त्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले आहेत. त्याचं झालं असं की राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर होते. त्यावेळी कन्याकुमारीमध्ये त्यांची फेलिक्ससोबत भेट झाली होती. फेलिक्स त्यावेळी पायात काहीही न घालता मुख्यमंत्री के. कामराज यांचं पोस्टर घेऊन उभा होता. त्यावेळी राहुल गांधी यांची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी राहुल यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला एका चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबवला होता.

राहुल गांधींच्या फेलिक्सशी गप्पागोष्टी
त्यावेळी राहुल यांनी फेलिक्सला जवळ घेऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवत चहाच्या स्टॉलकडे गेले. त्यावेळी फेलिक्ससोबत त्यांनी गप्पागोष्टीही केल्या. त्यावेळी राहुल यांनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. त्यावेळी आपल्याला धावायला आवडत असल्याचं फेलिक्सने सांगितलं होतं. मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? असा प्रश्न राहुल यांनी फेलिक्सला विचारला होता.

त्याचबरोबर तुला लवकरच स्पोर्ट्स शूज पाठवून देतो असा शब्दही राहुल यांनी फेलिक्सला दिला होता. तसंच ट्रेनिंगसाठी एखाद्या अकॅडमीत दाखल होण्यासाठी मदत करतो, असं आश्वासनही राहुल यांनी फेलिक्सला दिलं. दरम्यान, राहुल यांनी पाठवलेले स्पोर्ट्स शूज पाहून फेलिक्सच्या गालावर हसू उमटल्याचं पाहायला मिळालं.

error: Content is protected !!