ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

मलालाने Apple टीव्ही प्लससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मलालाने गेल्या वर्षी जूनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफझईचा आपल्या समाजकार्यामुळे जगभरात नावलौकिक आहे. आपल्या खासगी आयुष्यात तिला कार्टुन फिल्म खूप आवडतात. त्यामुळे मलालाने Apple टीव्ही प्लससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मलालाने गेल्या वर्षी जूनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

अवघ्या 23 वर्षाच्या असणाऱ्या मलालाने सोमवारी याबाबत एक घोषणा केली आहे. लहान मुलांसाठी ड्रामा, डॉक्यूमेंट्री, कॉमेडी, अॅनिमेशन आणि सीरीज बनवण्यासाठी Apple सोबत अनेक वर्षांसाठी करार केल्याची माहिती मलालाने दिली आहे. लहानपणी आपल्याला कार्टुन पाहण्यात मोठा आनंद मिळत होता. मुलांसाठी दहशतावादाच्या काळात कार्टुन हे एक असं विश्व आहे, जिथे ते आपल्या आजुबाजूला असलेल्या भीषण वास्तवापासून वाचू शकतात, असंही मलाला हिने म्हटलंय.
कार्टुन हसायला शिकवतं
कार्टुन फक्त हसतं आणि मुलांचं मनोरंजन करतं. तर आपण डॉक्यूमेंट्री आणि स्क्रिप नसलेले शोज करु इच्छित असल्याचं मलाला हिने सांगितलं. मला भेटणाऱ्या मुलींना मी या प्रवासात सहभागी करुन घेईन. मी सातत्याने चांगले विचार शोधत असल्याची प्रतिक्रिया मलालाने दिली आहे.

2014 मध्ये शांततेचा नोबेल
मलाला युसूफझई हिने 2014 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवला होता. हा पुरस्कार जिंकणारी ती सर्वात कमी वयाची विजेता आहे. मलाला यूसुफझई हिला मुलांना गुलामी, त्यांच्यावरील अत्याचार आणि बाल कामगारच्या समस्येवर काम करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ती आपल्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने आवाज उठवत असते.

मलाला ही अशा देशातून येते जिथे अशा प्रकारचे आवाज जाबण्याचंच काम केलं जातं. लहानपणी मलाला एका मोठ्या संकटातून वाचली आहे. शाळेत जाताना तिच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. तेव्हा तिचं वय अवघं 15 वर्षे होतं. या हल्ल्यातून वाचल्यानंतर मलाला यूसुफझईने मुलीच्या शोषणाविरोधात आपला लढा सुरु केला आहे.

error: Content is protected !!