ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये झाला आणि तेलांच्या किमंती तीन टक्क्यांनी वाढल्या

नवी दिल्ली: रविवारी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादित होणाऱ्या विहिरींवर आणि ठिकाणांवर हल्ले झाले. तेल ठिकाणांवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलांच्या किमंती तीन टक्क्यांनी वाढल्या. क्रुड ऑईलचा एक बॅरल 71.37 अमेरिकन डॉलर वर जाऊन पोहोचला. तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम भारतावर देखील होणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चढ्या राहू शकतात. भारताला सर्वाधिक खर्च खनिज तेल आयात करण्यावर करावा लागतो.

सौदी अरेबिया सर्वात मोठा तेल उत्पादक
सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. भारत सर्वाधिक तेलाची आयात सौदी अरेबियाकडून करतो. भारत हा जगातील खनिज तेल आयात करणारा अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठा देश आहे. भारतानं गेल्या आर्थिक वर्षात 85 टक्के तेल आयात केले होते तर त्यासाठी 120 अब्ज डॉलर खर्च केले होते. यामुळे सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरील हल्ल्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. रविवारी सौदी अरेबीयाच्या रास तुनरा या ऑईल टर्मिनलवर हल्ला झाला होता. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयानं हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे. इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांच्या गटानं सौदी अरेबियाच्या रास तनुरा टर्मिनलवर हल्ला केला होता.
आंतराराष्ट्रीय बाजारतील वाढत्या दरांची समस्या
2020 मध्ये फेब्रुवारी महिन्यात क्रुड ऑईलच्या किमती 20 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या. वर्षभरात त्यामध्ये 83 टक्के वाढ झाली आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमती कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला जातो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर 10 डॉलरनं वाढल्यास भारत सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. सध्या भारतातीn पेट्रोल चे दर 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

error: Content is protected !!