ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

आरोग्य विभागाची वादग्रस्त परीक्षा रद्द करा आणि एमपीएससी द्वारे फेरपरीक्षा लगेच घ्या

आरोग्य विभागाची वादग्रस्त परीक्षा रद्द करा आणि एमपीएससी द्वारे फेरपरीक्षा लगेच घ्या!

भरती प्रक्रियेचे आउटसोर्सिंग थांबवा!

उपजिल्हाधिकारी मार्फत आरोग्यमंत्र्यांना पाठवले निवेदन-डी वाय एफ आय

अंबाजोगाई( प्रतिनिधी):-

आरोग्य विभागातील भरतीसाठी 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती होती. या गोंधळामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवला गेला आहे.
अहमदनगर येथील परीक्षा केंद्रातील खोलीत एका बाकावर किमान आठ ते दहा परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असल्याचे छायाचित्रात दिसते आहे.
अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता, तर दापोली येथील परीक्षा केंद्रांवर उमेदवार सकाळी 10 वाजता पोहोचले. मात्र केंद्रच बंद होते. परीक्षेच्या वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक केंद्रावरून आल्या आहेत. सरळसेवा भरती असतानाही केंद्रांवर पोलीस संरक्षणही नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर एक तास ताटकळत परीक्षार्थींना उभे रहावे लागल्याने परीक्षा उशिरा सुरू झाली.
औरंगाबादमधील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप आहे, तर काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांनी गोंधळ केल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले..
आरोग्य विभागात साडे आठ हजार पदांसाठी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा आणि तालुका केंद्रांवर दोन सत्रांत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून राज्य शासनाच्या ‘महाआयटी’ने नेमलेल्या खासगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेविषयी प्रशचिन्ह उपस्थित केला जात आहे.
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा असा आरोप आहे की गैरव्यवहारासाठी १० ते १५ लाख रुपयांचा व्यवहार केला जात आहे. औरंगाबाद पोलिसांना जे सापडले ते म्हणजे हिमखंडाची फक्त एक कण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत अनेक केंद्रांवर गैरवर्तन, गैरव्यवहाराची आणि सामूहिक फसवणुकीची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील सुमारे ४००० पदे भरण्यासाठी साडेतीन लाखाहून अधिक उमेदवार हजर होते.
या परीक्षा सामान्य प्रशासन विभाग (जीएडी) द्वारे प्रशासित प्रशासकीय सेवेचा एक भाग आहेत. महाआयटी आणि जीएडी दोघांनीही जबाबदारी झटकली आहे. जीएडी आणि महाआयटी एकमेकांवर दोषारोप ठेवत आहेत. हे उल्लेखनीय आहे की २०१७ च्या नंतर प्रथमच आरोग्य विभागासाठी परीक्षा घेण्यात आल्या आहेत,समस्येचे गांभीर्य आणखीणच वाढते, कारण निवड प्रक्रिया खासगी कंपन्यांनी केली आहे ज्या महावितणाच्या वतीने गुंतलेल्या आहेत. अनेक घोटाळे झाल्यानंतरही खासगी कंपन्या भरती परीक्षा घेत आहेत ही गंभीर चिंतेची बाब आहे.
त्यामुळे सदरील परीक्षा रद्द करून एमपीएससी द्वारे परीक्षा घेण्यात यावी, भरती प्रक्रियेतील आऊटसोर्सिंग थांबवावे,प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांतून असावी यासह विविध मागण्यांसाठी आज डी वाय एफ आय महाराष्ट्र राज्य समिती वतीने राज्यभर आंदोलन, मोर्चे, निवेदने देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई उप जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे साहेब यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी डी. वाय.एफ.आयचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजय बुरांडे, जिल्हा कमिटी सदस्य सुहास चंदनशिव, देविदास जाधव, अंबाजोगाई ता. क.अ. प्रशांत म्हस्के,कृष्णा आघाव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!