ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशमुखांच्या आशीर्वादाने बंद काम असताना रात्रीतून कॉलम उभा झाले कसे?

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशमुखांच्या आशीर्वादाने बंद काम असताना रात्रीतून कॉलम उभा झाले कसे?
आठवडी बाजाराच्या उभे राहणारे बांधकाम प्रकरणी ग्रामसेवकाला बडतर्फ करा :-
डॉ.गणेश ढवळे यांची मागणी;पशुसंवर्धन अधिकारी देशमुखने चौकशीचा अहवाल लपवला का?
_____________________________
पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर नेकनूर येथील आठवडी बाजाराच्या परिसरात गाळ्याचे बांधकाम सुरू केल्यानंतर या कामाची स्थगिती मिळवली.तक्रारी केल्यानंतर चौकशी सुरू झाली.मात्र जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशमुख याच्या आशीर्वादाने चौकशीचा अहवाल गेला कोठे?मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार याच्या दुर्लक्षामुळे स्थगिती दिल्यानंतर बांधकाम जास्त झाले नव्हते.मात्र रात्रीतूनच कॉलम उभा करून अजित कुंभारला ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराने चांगलीच चपराक दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व मनमानी कारभार सुरू असताना स्थगिती असताना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चौकशीचा अहवाल का दवडत आहेत. नेकनूरच्या ग्रामसेवकाला का पाठीशी घालत आहेत असा प्रश्‍न उपस्थित होत असताना नेकनूरच्या ग्रामसेवकाला बडतर्फ करून या बांधकामाला अनुमती देणार्‍या सरपंचाला व इतर पदाधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी गणेश ढवळे यांनी केली आहे.

पशुसंवर्धन आधिकारी देशमुख म्हणतात अजून जागेची मोजणीच केली नाही दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अहवाल सादर नाही??? :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____________________________
दीड महिन्यापुर्वी जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी देशमुख यांनी चौकशीसाठी डाॅ.एस.एन.सानप पशुधन विकास आधिकारी गेवराई, एस. एल. सोळसे सहा. प्रशासन आधिकारी यांची समिती नेमली, परंतु या गोष्टीला दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अद्याप अहवाल सादर करण्याबाबत साशंकताच आहे कारण देशमुख जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी यांना अहवालाविषयी विचारणा केली असता अजून जागेची मोजणीच झाली नसल्याचे सांगितले यामुळेच दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572

error: Content is protected !!