ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मराठा आरक्षणाबाबतच्या व्यथा मा.शरदचंद्रजी पवार यांच्यासमोर मांडणारच…मनोज जरांगे पाटिल. 

मराठा आरक्षणाबाबतच्या व्यथा मा.शरदचंद्रजी पवार यांच्यासमोर मांडणारच…मनोज जरांगे पाटिल.

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””

साष्टपिंपळगाव मराठा आंदोलक निघाले 16 मार्चला विनंती करण्यासाठी बारामतीला…

====================

साष्टपिंपळगाव येथे गेले 50 दिवसापासून मराठा आरक्षण सरकारने देण्यात यावे म्हणून “राज्यव्यापी ठिय्या आंदोलन” सुरू आहे, पण मात्र हे बेजबाबदार सरकार आरक्षणाबाबत गांभीर्याने घेत नसल्यामुळे आता थेट मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच कानावर हा विषय प्रत्यक्ष जाऊनच घातला जाणार आहे आणि मराठा समाजावर जो नाहक अन्याय आरक्षण नसल्यामुळे होत आहे त्यावर मा. पवार साहेबांनी लक्ष घालून हा विषय निकाली काढावा असा आग्रह सकल मराठा समाजाच्या वतीने धरण्यात येणार आहे असे साष्टपिंपळगाव आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले आहे.

 

मराठा तरूणांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आरक्षण विषय आहे, हा विषय वर्षानुवर्षे राजकीय मंडळींची इच्छाशक्ती नसल्या कारणाने हा आरक्षण विषय जीवघेणा बनला आहे, जर मा.पवार साहेबांनी हा प्रश्न मनावर घेतला तर महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी समाधानी होवून, या स्पर्धेच्या युगात आपले नावलौकिक मिळवू शकतो.

 

मराठा तरूणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत, मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी साहेबांनी पुढाकारच घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी “आरक्षण आक्रोश विनंती रॅली” काढून बारामतीमध्ये जाऊन मा. पवार साहेब यांच्याकडे हट्ट धरला जाणारच आहे असे साष्टपिंपळगाव आंदोलक मनोज जरांगे पाटिल हे म्हणाले आहेत.

 

मा.पवार साहेब हे भारत देशातील मराठा समाजाचे प्रचंड मोठे ताकदवर नेते आहेत आणि ते हा मराठा आरक्षणाचा पेच सोडू शकतात, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मा.पवार साहेबांनी विनंती करून आपल्या मराठा तरूणांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे रहावे आणि मराठा तरूणांचा आक्रोश व आरक्षणामुळे होणार्‍या वेदना आता थांबवाव्यात अशी मागणी साहेबांकडे केली जाणार आहे.

 

आता मराठा आरक्षणाची मेख हि मा.पवार साहेबच काढू शकतात असे आता सकल मराठा समाजाला वाटू लागले आहे आणि मराठा समाजाचा विश्वास आता कोणत्याच सरकारवर राहिला नसून, आता आरक्षण मिळवून देण्याची कोंडी पवार साहेबच फोडू शकतात असा विश्वासही आता सकल मराठा समाजाला आहे, आता मा.पवार साहेबांना हिच योग्य वेळ आहे कि, ते आपल्या मराठा समाजाच्या तरूणांच्या पाठीवर हात ठेवून, आपल्या मराठा तरूणांच्या लढ्यात शेवटच्या क्षणी सहभागी होवून, आम्हाला न्यायच मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही साहेबांना करणारच आहोत.

 

मा.पवार साहेब, आम्हाला आता आपल्या मराठा तरूणांच्या यातना आता बघवत नाहीत, मराठा विद्यार्थ्यांचा टाहो आणि आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे, याच आरक्षणापायी आपल्या तरण्याबांड मराठा तरूणांचे बलिदान गेले आहे, आजही मराठा तरूणांची तगमग सहन होत नाही, या हाल आपेष्ठा काळ्याकुट्ट काळोखाप्रमाणे जीवघेण्या आहेत, मराठा तरूणांचा बाप राबराबतो व मुलाला शिक्षण देतो आणि आरक्षण नसल्यामुळे मुलगा सुशिक्षित बेकार म्हणून घरीच बसतो किंवा मुलगा आपली जीवनयात्रा संपवतो अन् तो बाप आपल्या मुलांचे डोंगराऐवढे दु:ख उराशी बाळगून सैरावैरा होतो, त्या मराठा बापाच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम आता मा. शरदचंद्रजी पवार साहेबांनाच करावेच लागणार आहे, मा.पवार साहेब जर यावेळेस मराठा आरक्षण मिळाले नाही तर या राज्यात महाभयंकर उद्रेक उसळू शकतो म्हणून आपण स्व:ताहा पुढाकार घेऊन हा उद्रेक रोखावा यातच राज्याचे आणि देशाचे हित आहे, जर हा मोठा संघर्ष टाळायचा असेल तर आता साहेबांनीच समोर येऊन दोन्ही सरकारला धारेवर धरावे आणि कायदेशीर सर्वे करून मा.गायकवाड आयोगाने मराठा समाजास मागास ठरवले आहे तेच कायदेशीर आरक्षण मा.पवार साहेबांनी आपल्या मराठा तरूणांना मिळवूनच द्यावे असे हि मनोज जरांगे पाटिल यांनी म्हटले आहे,यासाठीच सकल मराठा समाजाच्या वतीने साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलन येथून “आरक्षण आक्रोश विनंती रॅली” घेऊन आम्ही मा.पवार साहेब यांच्या घरी बारामती येथे 16 मार्च रोजी जात आहोत.

error: Content is protected !!