ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आधी देशांत लस पुरवा मग परदेशात बघा, सर्वोच्च न्यायालयाने लगावला केंद्र सरकारला टोला

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात नाही तर जगभरात कोरोना लसीची मागणी जोरदार वाढलेली आहे . सध्या अदार पुनावाला यांच्या सिरम संस्थेने तयार केलेल्या कोविशील्ड लसीला संपूर्ण जगभरातून मागणी वाढत आहे. त्यात आता पाकिस्तानला सुद्धा भारताकडून लस पुरवण्यात येणार आहे. मात्र केंद्रांच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशोरे ओढले आहे.

केंद्र सरकार ‘फारसा मैत्रभाव’ नसणाऱ्या देशांमध्ये कोरोनाची लस पुरवण्याचे करत आहे. मात्र, केंद्र सरकारने प्रथम देशात नाव कमवावे नंतर परदेशात नाव कमवावे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या निर्णयावर ताशोरे ओढले आहे.

न्यायमूर्ती विपिन संघी आणि रेघा पाली यांच्या खंडपीठासमोर झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून ही निरीक्षणे नोंदवण्यात आली. न्यायालयीन व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी वकिलांच्या संघटनेकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, केंद्राकडून कोरोनाची लस ही ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रथम दिली जाईल, या भूमिकेवर ठाम आहे.

भारताकडून पाकिस्तानला लसचे ४५ लाख डोस दिले जातील, असे वृत्त आहे. नेमके किती डोस दिले जाणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. मात्र पाकिस्तानने भारतात तयार होत असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

error: Content is protected !!